Monthly Archives: June 2016

पाऊस “तिच्या आठवणीतला”

 

oie_1fQbD8lnItZN

तो कोणाशीच बोलत नाही“, “लोकांनमध्ये मिसळत नाही“, अशी सर्वांची नेहमीच माझ्याबद्दल तक्रार असायची. आता त्यात थोड्याफार बदल झाला आहे अस म्हणायला काही हरकत नाही. पण तरीही कधी कधी मला माझ्याच वागण्यातून जाणवत, कि त्या तक्रारींमधे चुकिच अस काहीच नव्हते.

ऐकटेपणाशी माझी मैत्री तशी फार जुनी आहे. आणि मग यात स्वतःशी बोलण, जुन्या आठवणी पुन्हा गिरवण असे माझे उद्योग चालु असायचे. पण गेले काही दिवस माझ स्वतःशी बिनसल होत. काहितरी अनपेक्षित पण हवीहवीशी गोष्ट घडणार याची पुसटशी चाहुल मला होत होती.

आणि मग त्या पहाटे कसलीही पुर्वकल्पना न देता ती माझ्या आयुष्यात(मनातल्या विश्वात) आली. कुठेही प्रेमाबद्दल ऐकल, वाचल कि मी जिच चित्र माझ्या मनात रेखाटायचो ती हीच. तिचे ते डोळे ज्यांची नशा अजूनही
तशिच आहे, कोरलेले ओठ, मानेवर रुळलेले तिचे काळेभोर केस, ति अगदी माझ्या चित्रातल्या परीसारखीच होती.

तिच्या येण्याने सर्वच काही बदलुन गेल होत. माझ्यातल्या “मी” ची आता “तिने” जागा घेतली होती. माझ्या व्यतिरिक्त मी एका तिसऱ्या व्यक्तीसोबत इतक मोकळेपणाने बोलू शकतो हे मला तिच्या आल्या नंतर कळाल. तिच्या समोर
बसुन दिवसभर तिला ऐकत (आणि पाहत) रहाव, बस्स या व्यतिरिक्त मला बाकी
काहीच नको होत.

असच एकदा तिच्याशी गप्पा मारत होतो. ति कसल्यातरी विचारात गर्क होती. तिच्या कडे पाहून तिच काहीतरी नक्कीच बिनसल आहे याची कल्पना मला आलीच होती. मी हि जरा जपुन आणि मोजकच बोलण्याचा प्रयत्न करत होतो. असच बोलता बोलता मी तिला विचारल कि “अग तुला पावसाळा आवडतो का“? माझा हा प्रश्न ऐकताच तिच्या कोरलेल्या ओठांतुन आलेल हसु आणि गालावर पडलेली ति खळी, तिच आणि पावसाच नक्कीच काही नात आहे हे मला सांगून गेली.

तिच्यासाठी पाऊस हा तिच्यापासून दुर गेलेल्या प्रियकरासारखा आहे. ज्याची ति नेहमीच आतुरतेने वाट पाहत असते पण तो नेहमीच यायला उशीर करतो, मुद्दामूनच. आभाळत काळे ढग दाटून आले कि तिच मन अधिर होऊन जात, लाटांवर
हेलकावत असणाऱ्या त्या गलबतांसारखच. ढगांचा गडगडात झाला कि तो मला चिडवतोय अस तिला उगीच वाटत. पण तिला आतून हे सर्व आवडत असत. मी रुसले कि तो नक्कीच धावत येइल हे तिला ठाऊक असत म्हणून ति रुसुन बसते आणि मग तो येतो. त्याच्या पहिल्या सरी अंगावर घेतना जणु काही त्याने आपल्याला कुशीतच घेतल आहे अस तिला वाटू लागत. मग बाकी जगाच तिला भानच नाही राहत. पावसात नाचता नाचता मधेच ति रडते जे त्याला मुळीच आवडत नाही, खूप भांडतेे, खोटं खोटं त्याला मारते जे त्याला खुप आवडत. तो कधीच जाऊ नये अस तिला मनापासून वाटत पण त्याच जाणही तितकच गरजेच असत. घरी आल्यावर आरशासमोर चिंब भिजलेले केस सुखवताना तो आपल्याला खिडकितुन चोरुन पाहतोय कि काय अस तिला उगीच वाटत राहत.

इतक सांगून ति उभी राहिली आणि खिडकीजवळ गेली. या हि वेळी त्याने जरा जास्तच उशीर केला होता यायला. मगाशी यामुळेच तिचा चेहरा पडला होता हे आता मला समजल.

Advertisements